('तमंचे'च्या एका सीनमध्ये निखिल द्विवेदी आणि ऋचा चड्ढा)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि निखिल द्विवेदी स्टारर 'तमंचे या सिनेमाचा ट्रेलर
गुरुवारी रिलीज करण्यात आला. या सिनेमात ऋचा केवळ हॉट अवतारातच झळकणार नाहीये, तर को-स्टार निखिलसह इंटीमेट सीन्स देतानाही दिसणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिनेमातील इंटीमेट सीन्स करताना अभिनेता निखिल द्विवेदी मुळीच कम्फर्टेबल नव्हता. असे आम्ही म्हणत नाही तर, स्वतः निखिलने मुंबईत ट्रेलर लाँचिंगवेळी सांगितले.
निखिल म्हणाला, "मी आत्तापर्यंत जवळपास सर्वच प्रकारचे सीन्स केले, मात्र कधी लव्ह मेकिंग सीन केले नव्हते. या सिनेमात काम करताना कळले, की लव्ह मेकिंग सीन्स करणे किती कठीण काम असते. ऋचासह इंटीमेट सीन्स करताना मला खूप लाज वाटत होती. मी हे सीन्स करताना कम्फर्टेबल नव्हतो."
तर याविषयी ऋचाचे म्हणणे होते, की सिनेमातील इंटीमेट सीन्स हे टेक्निकल असून सर्वात अवघड सीन्सपैकी ते एक आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'तमंचे'मधील निखिल आणि ऋचाच्या रोमँटिक सीन्सची झलक...