आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाने केला खुलासा, पुढील वर्षी नाही करणार रणबीरसह लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ सध्या दोन गोष्टींमुळे जास्तच चर्चेत आहे. पहिली म्हणजे ती कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाणार आहे आणि दुसरी म्हणजे ती पुढील वर्षी ती रणबीर कपूरसोबत लग्न गाठित अडकणार आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा कतरिनाला विचारण्यात आल्या तेव्हा मात्र तिने या सर्व अफवा असल्याचे सांगितले.
कतरिनाने सांगितले, 'मी खूप दिवसांपासून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्याचा विचार करत होते. परंतु आता माझ्याजवळ वेळ नाहीये. माझ्याकडे सध्या खूप सिनेमे आहेत. त्यांचे प्रोजेक्ट रखडलेले आहेत. मला ते सर्व पूर्ण करायचे आहेत. म्हणून मी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाणार नाहीये.'
तिने कान फिल्म फेस्टिव्हलसोबतच रणबीरसह लग्न करण्याचा गोष्टीला स्पष्ट नकार दिला आहे. ती म्हणते, 'ही माझ्यासाठीसुध्दा एक बातमी आहे. माझे सध्या लग्नाचे कोणतेही प्लॅनिंग नाहीये. माझी इच्छा आहे, की हे सर्वांना ठाऊक झाले पाहिजे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कशी आली रणबीर कतरिनाच्या लग्नाची बातमी...?