आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'जज्बा'मध्ये ऐश्वर्या दिसणार 'मर्दानी' अवतारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन कपूर आणि राणी मुखर्जीनंतर आता ऐश्वर्या राय बच्चनसुध्दा मजबूत माहिलेची भूमिका असलेला सिनेमा करत आहे. मणिरत्नम यांच्या सिनेमातून ऐश्वर्या कमबॅक करणार अशा बातम्या आल्यानंतर अंदाज बांधणे सुरु झाले होते, की ती पुन्हा एकदा मल्टिस्टारर सिनेमातील नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र संजय गुप्ता यांच्या 'जज्बा' सिनेमा ऐश्वर्याचा पुनरागमनाचा सिनेमा ठरला असून ती जॉन अब्राहम आणि इरफान खान यांच्यासह दिसणार अशी बातम्या आल्या होत्या. मात्र विशेष गोष्ट अशी, की ऐश्वर्याची जोडी या दोन्ही स्टार्ससह नसेल. ऐश्वर्या या सिनेमात वकिलाची भूमिका साकारून कदाचित राणीसारखी 'मर्दानी' अवतारात दिसून येऊ शकते.
सिनेमात ती एका वकिलाची सक्षम भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामध्ये जॉन अब्राहम एक गँगस्टर च्या भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, इरफान खान एका निलंबित पोलिस अधिका-याचे पात्र साकारणार आहे. या सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
असे झाले, तर ऐश्वर्या करिअरमध्ये दुस-या टप्यात नवी भूमिकेने ओळख निर्माण करू शकते. 'मर्दानी'सह राणी मुखर्जीने यशस्वी पुनरागमन केले तर श्रीदेवीने 'इंग्लिश विंग्लिश'मधून पुन्हा दमदार पाऊल इंडस्ट्रीमध्ये ठेवले. ऐश्वर्याचा हा सिनेमा यशस्वी ठरला तर तिच्याही पदरी पुनरागमनाचे समाधान येऊ शकते.