आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himmanshoo Says, Honeymoon Destination Hasn't Been Decided

INTERVIEW : हिमांशू सांगतो, 'सध्या हनीमूनचे प्लानिंग नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा)

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा आज लग्नगाठीत अडकले. दिल्लीत दोघांचा लग्नसोहळा रंगला. मुळची मुंबईची असलेली अमृता दिल्लीची सून झाली. दहा वर्षांपूर्वी झी सिनेस्टार की खोज या शोमध्ये हिमांशू आणि अमृताची भेट झाली. भेटीचे मैत्रीत, मैत्रीचे प्रेमात आणि आता प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले आहे.
अमृताची मेंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर 23 जानेवारी रोजी दिल्लीत संगीत आणि कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
लग्नाचे औचित्य साधत आम्ही हिमांशू मल्होत्राकडून त्याच्या लग्नाचे आणि भावी आयुष्याच्या प्लानिंगविषयी जाणून घेतले आहे.
दिल्लीत किती दिवस लग्नाचे कार्यक्रम होणार आहेत?
हिमांशूः दोन दिवस लग्नसोहळा रंगणार आहे. 23 जानेवारी रोजी संगीत आणि कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे, तर 24 तारखेला लग्न होणार आहे.
दिल्लीत लग्नसोहळ्यांसाठी हिवाळा या ऋतूला विशेष पसंती दिली जाते...?
हिमांशूः लग्नसाठी हिवाळा हा ऋतू बेस्ट असल्याचे मला वाटते. उन्हाळ्यात लग्न करण्याविषयी मी विचारही करु शकत नाही. हा प्रेमळ ऋतू आहे, असे माझे मत असून आम्ही दोघांनी याचकाळात लग्न करण्याचे ठरवले.
तुझा वेडिंग ड्रेस कुणी डिझाइन केला आहे?
हिमांशूः माझ्या मित्राने. त्याचे नाव युवराज असून तो दिल्लीतील प्रसिद्ध डिझायनर आहे. गेल्या दशकापासून माझी आणि त्याची मैत्री आहे. त्याने दिल्लीत भरपूर काम केले असून अनेक फॅशन शोसाठी कपडे डिझाइन केले आहे. त्याला माझी चॉइस आणि टेस्ट माहित असल्याने मी त्याची निवड केली.
हनीमूनचे काय प्लानिंग आहे, अमृता आणि तू कुठे जाण्याचा विचार केला आहे?
हिमांशूः खरं सांगू, अद्याप आम्ही हनीमूनविषयी काहीच विचार केलेला नाही. मी मार्च महिन्यापर्यंत एअरलाईन्स या मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. एकदा हे शूटिंग संपले, की आम्ही पुढचा विचार करणार आहोत. मात्र परदेशात हनीमून सेलिब्रेट करण्याचे आम्ही ठरवले आहे. कुठे ते नंतर सांगेल.
अमृताविषयीची कोणती गोष्ट तुला जास्त भावते?
हिमांशूः अमृताविषयीची खास गोष्ट म्हणजे तिचा विनोदी स्वभाव. ती मस्तीखोर आणि भावूक आहे. ती कधीही खोटे बोलत नाही किंवा काही लपवत नाही. ती 'खुली किताब' आहे. ती जशी आहे, तशी मला खूप आवडते.
आणखी काय म्हणाला हिमांशू, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...