('दिलवाले दुन्हनिया ले जायेंगे'च्या एका सीनमध्ये काजोल आणि शाहरुख खान)
मुंबई: बातमी आहे, की बॉलिवूडचा आतापर्यंतचा सर्वात जास्त चाललेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमा मराठा मंदिर थिएटरमधून उतरवला जाणार आहे. हा सिनेमा 1995मध्ये रिलीज झाला होता आणि जवळपास 20 वर्षांनी मुंबईच्या सिंगल स्क्रिन मराठा मंदिर या थिएटरवर चालू होता. डिसेंबर महिन्यात
बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची स्क्रिनिंग पूर्णत: बंद करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याविषयी अधिक माहिती देताना मराठा मंदिरचे व्यवस्थापकीय संचालक मनोज देसाई यांनी सांगितले, 'सिनेमा 900 आठवडे चालल्यानंतर आम्ही आणि यशराज प्रॉडक्शनने निर्णय घेतला आहे, की हा सिनेमा पूर्ण 1000 आठवडे चालवला जाणार आहे. 12 डिसेंबर 2014 रोजी सिनेमाचे एक हजार आठवडे पूर्ण होत आहेत. सध्या, आम्हाला प्रॉडक्शन हाऊसकडून अशी कोणतीही माहिती मिळेलेली नाहीये. आम्ही त्यांच्या फोनची प्रतिक्षा करत आहोत. जेणेकरून आम्ही हा सिनेमा 1000 आठवड्याच्या पुढे चालवू शकू. जर आम्हाला त्यांच्याकडून काही माहिती मिळाली नाही तर आम्हाला सिनेमा थिएटरमधून काढून लागेल.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रविवारी तिकीट मिळणे होते कठिण आणि वर्ल्ड रेकॉर्डसाठी आतापर्यंत चालू होता सिनेमा...