आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Salman Khan's Staff Members Invited In Arpita's Wedding.

बहिणीच्या लग्नात सलमानने स्टाफला केले नाही आमंत्रित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बहीण अर्पिता खानसोबत सलमान खान)
मुंबई- 18 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिताचे लग्न बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्न होणार आहे. या लग्नात माध्यमांपासून ते अनेक बॉलिवूड कलाकार, दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
सलमानने आपल्या बहिणीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून शाहरुख खान, आमिर खानसारख्या व्हिआयपी लोकांनाच केवळ आमंत्रित केले आहे.
सलमानने आपल्या स्टाफलासुध्दा या लग्नाचे आमंत्रण दिले नाहीये. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'सलमानने फक्त VIP लोकांच या लग्नात बोलावले आहे. एवढेच नव्हे, त्याचे स्टाफ मेंबर्ससुध्दा या लग्नात सामील होणार नाहीये. शेरा आणि काही निवडक बॉडीगार्ड्स सोडून त्याचे इतर बॉडीगार्ड्सदेखील या लग्नात सामील होणार नाहीये.'