आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nora Fatehi Grooves With Imran Hashmi In \'Mr.X\'

बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देण्यास सज्ज झाली ही परदेशी बाला, पाहा ग्लॅमरस छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री नोरा फातेही)
मुंबई: बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी परदेशी बाला नेहमीच आपले नशीब आजमावाताना दिसतात. त्यामध्ये काही बॉलिवूडमध्ये यशस्वी होतात तर काहींवर फ्लॉपचा शिक्का बसतो. कतरिना कैफ, नर्गिस फाखरी, ऐली अवराम आणि जॅकलीन फर्नांडिसनंतर आता कॅनेडिअन मॉडेल नोरा फातेहीसुध्दा असेच स्वप्न उराशी बाळगून बी-टाऊनमध्ये एंट्री घेत आहे.
मोरक्कोची मुळ रहिवासी मॉडेल नोरा फातेहीने अलीकडेच, आलेल्या कमल सदानाच्या 'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सिनेमातील तिचे 'रूबरू' गाणे बरेच चर्चेत आहे. नोरा यापूर्वी 'डव'च्या जाहिरातीत दिसली होती. नोरा सिनेमांत येण्यापूर्वी अनेक डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉकसुध्दा करत होती. आता नोरा प्रकाश झा यांच्या 'क्रेजी कुक्कड फॅमिली' सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे.
महेश भट्ट यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार होणा-या 'मिस्टर एक्स'मध्ये नोरा आयटम नंबर करताना दिसणार आहे. शिवाय, ती पूरी जगन्नाथ यांच्या सिनेमातसुध्दा आयटम नंबर करत आहे. सध्या ती नोराच्या प्रोजेक्टकडे पाहून असेच वाटते, की ती बी-टाऊनमध्ये नाव उंचावण्यासाठी धडपडत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक कपूर पाहा नोराचे निवडक ग्लॅमरस फोटो...