आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Knowing Character,To Play That\'s Challenge Surbhi Hande

व्यक्तिरेखा माहीत नसताना ती साकारणे आव्हानात्मक, म्हाळसा फेम सुरभी हांडेचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रोज विविध भूमिका साकारणे जेवढे आव्हानात्मक आहे, तेवढेच आव्हानात्मक एखादी व्यक्तिरेखा माहीत नसताना ती साकारणे. जय मल्हार मालिका करण्यापूर्वी मला खंडोबा देवाबद्दल काही एक माहीत नव्हते. ज्या वेळी मी पहिल्यांदा कथा वाचली, त्या वेळी म्हाळसा नाव बदलता येणार का, अशी विनंती मी दिग्दर्शकांकडे केली होती. पण, आता मी त्यात एवढी रमले की, म्हाळसाचे ड्रेसअप काढल्यावर मी उदास होते. दिवसातील १३ तास मी म्हाळसा असते, तर बाकीच्या वेळी मी सुरभी असते. म्हाळसाने माझी आव्हानात्मक भूमिका करण्याचे स्वप्न पूर्ण केले, अशी भावना जय मल्हार मालिकेतील म्हाळसा फेम सुरभी हांडे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.

म्हाळसा आणि सुरभी या दोन भिन्न व्यक्तिरेखा असून, म्हाळसामुळे मला सुरभी शोधता आली. माता जिजाऊ, झाशीची राणी अशी एखादी भूमिका आपल्याला मिळावी, अशी आशा सुरुवातीपासून होती. जय मल्हार या मालिकेची स्क्रिप्ट वाचल्यानंतर म्हाळसा कोण, कशी याबाबत काहीही माहीत नव्हते. पुण्याजवळ जेजुरीला कोणत्यातरी देवाचे स्थान आहे, एवढीच काय ती माहिती. त्यामुळेच देवी म्हाळसाचे नाव बदलता येईल का, अशी इनोसन्ट विनंती मी केली. पण, आता मी या भूमिकेत एवढी रमले की, म्हाळसाचे रूप बदलल्यानंतर, तो गेटअप काढल्यानंतर मी उदास होते. या मालिकेमुळे मला समजले की, म्हाळसा हेदेखील एक आव्हानात्मक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी १२ वर्षे जेजुरी सांभाळली म्हणजे त्यासुद्धा माता जिजाऊंप्रमाणेच प्रेरणादायी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुढे वाचा ... म्हाळसा ही व्यक्तिरेखा मुळात आव्हानात्मक