(फाइल फोटो - अभिनेत्री अंजली द्विवेदी)
नवी दिल्ली - तेलगू अभिनेत्री अंजली द्विवेदी सध्या खूप काळजीत पडली आहे. झाले असे, की मायक्रो ब्लॉगिंग साइट
ट्विटरवर अंजलीने तिच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एका बनावट अकाउंटवर स्वतःची न्यूड छायाचित्रे पाहिली. या घटनेनंतर बनावट अकाउंटविषयीची माहिती अंजलीने तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला असून बनावट अकाउंट बंद केले.
अंजली तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच ती बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत स्थायिक झाली आहे. अंजली मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीने आपल्या कुटुंबीय आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी ट्विटरवर अकाउंट ओपन केले होते. एकदिवशी तिच्या एका मित्राने फोनवरुन तिला माहिती दिली, की तिच्या नावाने एक बनावट अकाउंट ओपन करण्यात आले असून त्यावर तिची आक्षेपार्ह्य छायाचित्रे बघायला मिळत आहेत. काही लोकांनी त्या छायाचित्रांना लाइकसुद्धा केले होते. पोलिस अज्ञात व्यक्तिचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.