आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 72 तर कुणी 79 वर्षांचे, वाढते वय ठरत नाही या Celebsच्या अभिनयात आडकाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून: धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर)
मुंबईः अक्षय कुमार स्टारर 'द शौकीन्स' हा सिनेमा सिल्व्हर स्क्रिनवर दाखल झाला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा काय कमाल दाखवतोय याचा निर्णय विकेंडला होईल. तसे पाहता, सिनेमाविषयी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे अक्षय यावर्षी यशाची हॅटट्रिक करणार असे दिसतेय. या सिनेमाच्या यशाचे श्रेय एकट्या अक्षय नव्हे तर सिनेमात काम करणा-या आणखी तीन अभिनेत्यांना मिळणार आहे. या तिघांनी आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
होय, आम्ही बोलतोय तीन ज्येष्ठ अभिनेते अर्थातच अनूपम खेर, अन्नू कपूर आणि पियूष मिश्रा यांच्याविषयी. या तिन्ही स्टार्सचे वय 50 पेक्षा जास्त आहे. अनूपम खेर 59 वर्षांचे तर अन्नू कपूर 58 वर्षांचे आहेत. पियुष मिश्रा या दोघांपेक्षा वयाने लहान असून त्यांनी वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. अर्थातच सिनेमात म्हाता-यांची भूमिका साकारणा-या या कलाकारांनी खासगी आयुष्यातसुद्धा म्हातारपणात पाऊल ठेवले आहे. मात्र या कलाकारांचा अभिनय आणि उत्साह पाहून त्यांना म्हातारे म्हटेल जाऊ शकत नाही.
इंडस्ट्रीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांचे वय 55 पेक्षा जास्त आहे, मात्र यावयात आजही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत असून वाढते वय त्यांच्या अभिनयात आडकाठी ठरत नाहीये.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बी टाऊनमधील अशा स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. काही अभिनेत्यांनी तर वयाची सत्तरी पार केली आहे. मात्र त्यांचा कामचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावाचा समावेश या यादीत आहे. त्यांच्याव्यतिरिक्त धर्मेंद्र, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, ओम पुरी, रजनीकांत, कमल हासन, मिथुन चक्रवर्तीसह अनेक सुपरस्टार्स आहेत, जे सिनेसृष्टीत कार्यरत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशा स्टार्सविषयी ज्यांचे वय 55पेक्षा जास्त आहे...