आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज बब्बर यांना बघून घाबरायच्या तरुणी, 'इंसाफ का तराजू'मध्ये साकारला होता नराधम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज बब्बर, झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांची प्रमुख भूमिका असलेला 'इंसाफ का तराजू' हा सिनेमा आजही प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. याचे कारण म्हणजे राज बब्बरने या सिनेमात साकारलेली भूमिका.
राज बब्बर यांनी या सिनेमात आपल्या सशक्त अभिनयाने भूमिकेत जीव ओतला होता. या सिनेमानंतर तरुणी चक्क राज बब्बर यांना घाबरु लागल्या होत्या. या सिनेमात अभिनेत्रींवर बलात्कार करणा-या बलात्का-याची भूमिका राज बब्बर यांनी साकारली होती. यामध्ये शेवटी नायिका त्यांची गोळी मारुन हत्या करते. या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली. या सिनेमानंतर राज बब्बर यांचे अनेक उत्कृष्ट सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांमुळे ते बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सामील झाले.

या सिनेमात राज बब्बर यांच्यासह झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे मेन लीडमध्ये होत्या. तसे पाहता झीनत बोल्ड अभिनेत्री म्हणून परिचयाची आहे. मात्र पद्मिनीने ऐंशीच्या दशकात सिल्व्हर स्क्रिनवर जो बोल्डनेस दाखवला होता, तो बघून प्रेक्षक दंग झाले होते.
आज राज बब्बर यांचा वाढदिवस आहे. याचेच औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या गाजलेल्या या सिनेमाशी निगडीत काही खास गोष्टी सांगत आहोत...