आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Om Puri Nephew Dies At Tv Series Mahabharat Success Party

\'महाभारत\'च्या सक्सेस पार्टीत घडली दुःखद घटना, ओम पुरी यांच्या पुतण्याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - इनसेटमध्ये वेद पुरी)

मुंबई - स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'महाभारत' या मालिकेला मिळालेले यश साजरे करण्यासाठी मुंबईत कलाकारांसाठी एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या पार्टीत असे काही घडले की आनंदाला दुःखाची किनार लागली. या पार्टीत 'महाभारत'चे पोस्ट-प्रॉडक्शन मॅनेजर वेद पुरी यांचा अकस्मात मृत्यू झाला. वेद पुरी अभिनेते ओम पुरी यांचे पुतणे होते.
पार्टीदरम्यान रात्री दीडच्या सुमारास वेद पुरी यांच्या छातीत अचानक कळ आल्यामुळे ते डान्स फ्लोअरवर पडले. त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे महाभारतच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे.
या घटनेच्या काही तासांपूर्वीच वेद पुरी याना कॉश्च्युमच्या उत्कृष्ट कामासाठी निर्मात्यांकडून ट्रॉफी मिळाली होती. महाभारत या मालिकेची निर्मिती संस्था स्वस्तिक प्रॉडक्शनसह वेद पुरी गेल्या सात वर्षांपासून काम करत होते. या प्रॉडक्शनच्या ब-याच मालिकांसाठी त्यांनी काम केले होते. पुरी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
पुढे वाचा, ओम पुरी यांना दिल्लीत मिळाली वेद पुरी यांच्या निधनाचे वृत्त...