आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: फराह खाननेसुध्दा उडवली आलियाची खिल्ली, म्हणाली, 'नेहमीच ढासळतो तिचा तोल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: आलिया भट्ट आणि फराह खान
विनोदी स्वभावासाठी दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तिच्या परिचयाच्या लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी एका पार्टीत आलिया भट्ट नेहमी तोल जाऊन खाली पडत असते असे म्हणून फराहने तिची खिल्ली उडवली. आलियावर अनेक जोक्स बनले आहेत, मात्र तिची एक सवय खूप कमी लोकाना ठाऊक आहे. ती चालता-चालता अचानक खाली पडते.
तिला स्वत:च्या नादात आणि बेजबाबदारपणात राहण्याची सवय आहे. तिला संभाळण्यासाठी लोक नेहमी तिच्या आजूबाजूला उपस्थित असतात. तिचा को-स्टार वरुण धवनने असेही सांगितले होते, की आलिया उभी असतानासुध्दा तिचा तोल जातो. या गोष्टीचा उल्लेख करताना आणि तिची खिल्ली उडवताना फराह खान म्हणाली, 'आलिया सतत तोल ढासळून खाली पडते'
कमजोर सामान्य ज्ञानामुळे अनेकदा झाली आहे जोक्सची शिकार
जशाप्रकारे फराहने आलियाच्या सवयीची खिल्ली उडवली. तसेच, कमजोर सामान्य ज्ञानामुळे ती अनेकदा जोक्सची शिकार झाली आहे. हे जोक्स सोशल साइट्सवर खूप शेअर झाले आणि लोकांनी तिची हवी तशी खिल्ली उडवली. ती सोशल साइट्सवर विनोदांची शिकार होण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी ती करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये परिणीती चोप्रासह आली होती. तिथे तिला विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांच्या उत्तराकडे पाहून तिच्या सामान्य ज्ञानाचा आढावा लोकांना आला. तिचे कमजोर ज्ञान बघून लोकांनी तिला सोशल साइट्सवर टार्गेट करण्यास सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोशल साइट्सवर आलियाची कशाप्रकारे खिल्ली उडवली जाते...