आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OMG! Shah Rukh Khan Makes Fun Of Aamir Khan’S PK Poster

OMG : 'पीके'च्या न्यूड पोस्टरवरुन शाहरुखने उडवली आमिरची खिल्ली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('गॉट टॅलेंट वर्ल्ड स्टेज लाइव्ह'च्या लाँचिंगवेळी शाहरुख खान)
मुंबई - 'पीके'च्या न्यूड पोस्टरवरुन अभिनेता आमिर खानची खिल्ली उडवण्यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसुद्धा मागे नाहीये. 'गॉट टॅलेंट वर्ल्ड स्टेज लाइव्ह' या नवीन टीव्ही शोच्या लाँचिंगवेळी अँकर मिनी माथूरने शाहरुखला प्रश्न विचारला, की तुझ्यात असे काही टॅलेंट आहे, जे तू अद्याप प्रेक्षकांना दाखवले नाही, लपवून ठेवलेले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने गमतीशीर अंदाजात म्हटले, "तू मला माझ्या टॅलेंटविषयी विचारत आहेस, की 'पीके'च्या पोस्टरविषयी."
त्यानंतर एका पत्रकाराने शाहरुखला प्रश्न केला, की तू आमिरचे टॅलेंटने परिपूर्ण असलेले 'पीक'चे पोस्टर बघितले आहे का? या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, "तुच मला सांगितले की पोस्टर टॅलेंटने परिपूर्ण आहे. मात्र आमिरला जाऊन सांगू नकोस की न्युडिटीसुद्धा टॅलेंट आहे."
साहजिकच सामान्यांप्रमाणे आता शाहरुख खानसुद्धा 'पीके'च्या पोस्टरवर आपले मत व्यक्त करतोय.
नोट : शाहरुख खानच्या 'गॉट टॅलेंट वर्ल्ड स्टेज लाइव्ह' या नवीन शोचे लाँचिंग शुक्रवारी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये करण्यात आले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटवेळी क्लिक झालेले शाहरुखचे काही एक्सप्रेशन्स...