आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्व्हर स्क्रिनवर हृतिक आज करणार 'बँग बँग', पाहा On Location Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात कतरिना कैफची गळाभेट घेताना हृतिक रोशन, दुस-या छायाचित्रात स्टंट करताना हृतिक)
मुंबईः बॉक्स ऑफिसवर आज 'बँग बँग' हा सिनेमा रिलीज होतोय. हृतिक रोशन या सिनेमात मेन लीडमध्ये असून कतरिना कैफ त्याच्या अपोझिट दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर, प्रोमो आणि गाणी लोकांच्या पसंतीस पडली आहेत. त्यामुळे या सिनेमाला बंपर ओपनिंग मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सिनेमात हृतिकने शानदार स्टंट आणि अॅक्शन सीन्स केले आहेत. आयुष्यात ज्या प्रकारचे अॅक्शन सीन्स करायची इच्छा होती, त्या प्रकारचे स्टंट मला या सिनेमात करण्याची संधी मिळाली, असे हृतिकने एका मुलाखतीत म्हटले होते. अॅक्शनसोबत त्याचा डान्ससुद्धा या सिनेमाचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. शिवाय अनेक सुंदर लोकेशन्सही सिनेमात बघायला मिळणार आहेत. या सिनेमातील अनेक सीन्स शिमला येथे शूट करण्यात आले आहेत. परदेशातही सिनेमाचे बरेचसे शूटिंग पार पडले आहे.
'बँग बँग' हा सिनेमा सिद्धार्थ राज आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओ या सिनेमाचे निर्माते आहेत. विशाल-शेखर यांनी सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. या सिनेमाचे एकुण बजेट 140 कोटी रुपये आहे. यामध्ये सिनेमाच्या प्रचाराच्या खर्चाचा समावेश आहे. हृतिक आणि कतरिना यांच्यासह डॅनी डैंग्जोप्पा आणि जावेद जाफरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बँग बँग'च्या शूटिंगची निवडक ऑन लोकेशन छायाचित्रे...