आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • On Location Pics Of Marathi Serial Pudhacha Paul

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'पुढचं पाऊल\'मध्ये अक्कासाहेब-जयवंतराव यांच्या लग्नसोहळ्याची लगबग, पाहा Behind The Scenes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पुढचं पाऊल या मालिकेतील पडद्यामागची छायाचित्रे...)

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'पुढचं पाऊल' या मालिकेतील सरदेशमुख कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सरदेशमुख कुटुंबीयांनी अक्कासाहेब आणि जयवंतराव यांचे पुन्हा लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी घरी लग्नाची जय्यत तयारीसुद्धा करण्यात आली आहे. यानिमित्ताने सरदेशमुखांच्या घरी ब-याच दिवसांनी आनंदसोहळा साजरा केला जातोय.
आता लग्न म्हटलं की सर्वांची लगबग सुरु होते. अगदी तिच लगबग येथेही पाहायला मिळत आहे. हा लग्नसोहळा शानदार व्हावा, यासाठी कोणतीही कसर शिल्लक सोडण्यात आलेली नाही. अगदी घर सजवण्यापासून ते दाग-दागिने, साड्या सर्वांची हौस पूर्ण केली जात आहे.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पडद्यामागची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये तुम्हाला मालिकेतील कलाकारांसह क्रू मेंबर्सची लगबग पाहायला मिळणार आहे. एपिसोड चांगला रंगावा यासाठी सर्वजण मेहनत घेताना दिसत आहे. याशिवाय मेकअपरुमध्ये कल्याणीसह तिच्या जाऊ आणि नणदेची मजामस्तीसुद्धा तुम्हाला या पॅकेजमधून पाहता येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा दागदागिने-भरजरी साड्यांमध्ये सजलेल्या अभिनेत्री, संवाद पाठ करताना आस्ताद, प्रदीप वेलणकर आणि क्रू मेंबर्सची खास छायाचित्रे...
(फोटो सौजन्य - फेसबुक)