आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच सिनेमात झाले HIT, तरीही बॉलिवूडमधून \'गायब\' झालेत हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीया मिर्झा बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींमध्ये सामील आहे ज्यांचे करिअर जास्त यशस्वी राहिले नाही. परंतु तिने जो सिनेमा केला त्यात तिला पसंत केल्या गेले. दीयाने काल (9 डिसेंबर) 33वा वाढदिवस साजरा केला. दोन महिन्यांपूर्वी ती बिझनेसमन साहिल संघासोबत लग्नगाठीत अडकली.
2000मध्ये मिस आशिया पॅसिफीक इंटरनॅशनलचे टायटल जिंकल्यानंतर दीयाने सिनेमांकडे मोर्चा वळवला. 2001मध्ये आर. माधवन अभिनीत 'रहना है तेरे दिल मै' सिनेमातून एंट्री केली. या सिनेमासाठी तिला बेस्ट डेब्यू अॅक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. सौंदर्यासह तिच्या अभिनयालासुध्दा पसंत केल्या गेले. परंतु ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवू शकली नाही.
'रहना है तेरे दिल मै'नंतर ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘दम’, ‘दस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘कॅश’सारख्या सिनेमांमध्ये दीयाने काम केले. दीया बॉलिवूडच्या 'वन फिल्म वंडर स्टार्स' स्टार्समध्ये सामील आहे. जे स्टार्स पहिल्या सिनेमात ठरले आणि नंतर अचानक रुपेरी पडद्यावरून गायब झालेत अशा कलाकारांच्या यादीत दीया आहे.
असे म्हटले जाते, की बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ एका यशस्वी ब्रेकची गरज असते. परंतु येथे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना यशस्वी ब्रेक मिळाला मात्र त्याचा त्यांना फायदा झाला नाही आणि ते लाइमलाइटपासून दूर गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणते स्टार्स आहेत ज्यांनी पहिले हिट सिनेमे दिल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झालेत...