आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निपथ'मधील संजय दत्‍तचा डायलॉग ठरला वादग्रस्‍त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंदर- 'श्रीकृष्‍णाने गीतेच्‍या 18 अध्‍यायांमध्‍ये संपूर्ण जीवनाचे सार सांगितले आहे. त्‍यामुळे 19व्‍या अध्‍यायाची गरज नाही. असे करण्‍याची कुणी हिंमतही करू नये', असे मत श्री गीता जयंती महोत्‍सव संघाचे महासचिव प्रमोद मल्‍होत्रा यांनी जालंदर येथील एका कार्यक्रमात व्‍यक्‍त केले.
'अग्निपथ' या चित्रपटात संजय दत्‍त एका प्रसंगात म्‍हणतो की, 'गीता का 19वा अध्‍याय मैं लिखूंगा'. संजयच्‍या या वाक्‍यावर मल्‍होत्रा यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. हे वाक्‍य चित्रपटातून काढून टाकण्‍यात यावे अन्‍यथा चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही, अशी धमकीही त्‍यांनी निर्मात्‍यांना दिली.
मल्‍होत्रा पुढे म्‍हणाले, 'श्रीकृष्‍णाने सांगितलेल्‍या गीतेला प्रमाण मानून संपूर्ण मानव जात त्‍यातील तत्‍त्‍वांचे आचरण करते. संजय दत्‍तला गीतेचा 19वा अध्‍याय लिहिण्‍याचा अधिकार कोणी दिला? गीतेवर नितांत श्रद्धा ठेवणारे लोक हे सहन करू शकत नाहीत. आम्‍ही लोकशाही पद्धतीने याचा निषेध करू. चित्रपट प्रदर्शित होण्‍यास अजून आठ दिवस शिल्‍लक आहेत. तोपर्यंत निर्मात्‍यांनी हे वाक्‍य चित्रपटातून काढून टाकायला हवे.'