आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओप्रा विन्‍फ्रेने बेटी बीला संबोधले 'राजकन्‍या'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध आंतरराष्‍ट्रीय टॉक शोची सूत्रसंचालक व अभिनेत्री ओप्रा विन्‍फ्रेचे नुकतेच मुंबईत आगमन झाले. मुंबईत पोहोचल्‍यावर ओप्रा लगेच बच्‍चन यांच्‍या 'जलसा' बंगल्‍यावर गेली. छोट्याशा बच्‍चन कन्‍येला बघताच ओप्राने तिला 'राजकन्‍या' असे संबोधले.
ओप्राला अनेक दिवसांपासून बच्‍चन 'राजकन्‍येची' एक झलक पाहण्‍याची इच्‍छा होती. त्‍यामुळे मुंबईत पोहोचताच थोडाही वेळ न दवडता तिने बच्‍चन परिवाराला प्रत्‍यक्ष जाऊन शुभेच्‍छा देण्‍याचा निर्णय घेतला. ऐश्‍वर्या- अभिषेक आणि संपूर्ण बच्‍चन परिवारासोबत थोडा वेळ घालवला. भारतीय परंपरेनुसार, ऐश्‍वर्याने ओप्राला केशरी आणि लाल रंगाचा संगम असलेली एक सुंदर साडी भेट म्‍हणून दिली.
बच्‍चन परिवाराचा पाहुणचार स्‍वीकारून ओप्राने त्‍यांची रजा घेतली. त्‍यानंतर ती परमेश्‍वर गोदरेज यांच्‍या पार्टीत सहभागी झाली. त्‍यावेळी तिने ऐश्‍वर्याने भेट दिलेली साडीच परिधान केली होती. पारंपरिक भारतीय वेशभुषेत ओप्रा सुंदर दिसत होती.
या पार्टीत ओप्रा बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरूख खान, लारा दत्‍ता, मधुर भांडारकर तसेच इतर अनेक कलाकारांनाही भेटली.