आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओप्राच्‍या सुरक्षारक्षकांनी केली पत्रकारांच्‍या कॅमे-यांची तोडफोड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- भारत दौ-यावर आलेली आंतरराष्‍ट्रीय टॉक शोची सूत्रसंचालिका ओप्रा विन्‍फ्रे वादात अडकली आहे. तिच्‍या सुरक्षारक्षकांनी पत्रकारांच्‍या कॅमे-यांची तोडफोड केली असल्‍याचे प्रकरण समोर आले आहे.
ओप्रा वृंदावन या धार्मिक स्‍थळाला भेट देण्‍यासाठी गेली असता काही पत्रकारांनी तिची छायाचित्रे काढण्‍याचा प्रयत्‍न केला. सुरक्षारक्षकांनी पत्रकारांना समजावण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, ते ऐकत नसल्‍याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी त्‍यांना मारहाण केली. त्‍यावेळी तिथे लोकांची बरीच गर्दी जमली होती.
यावेळी ओप्राने भारतीय पारंपरिक कपडे परिधान केले होते. मथुराला भेट दिल्‍यानंतर ती सध्‍या आग्रा येथे पोहोचली आहे.