आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चांदी\'मध्ये थ्रीडी रुपात दिसणार खरेखुरे \'पु. लं. देशपांडे\' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. लं. देशपांडे यांच्या 'म्हैस' या कथेवर आधारित 'चांदी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या माध्यमातून 40 ते 45 वर्षांनंतर पु. लं. देशपांडे यांचे दर्शन प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर घडणार आहे. ते या सिनेमात केवळ दिसणार नसून कलाकारांबरोबर अभिनयही करणार आहेत. ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हा चमत्कार घडणार असून अशा पद्धतीने झालेला हा मराठीतील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

याविषयी 'चांदी' सिनेमाचे लेखक अनिल पवार यांनी सांगितले की, ''पुलंची 'म्हैस' आम्ही मोठ्या पडद्यावर आणतोय. फक्त त्यामध्ये गरज म्हणून आम्ही कथानक गुंफले आहे. म्हणजे पुलंच्या या गोष्टीतील पात्रे कुठुन आली असावीत याचा थोडा विस्तार आम्ही केला आहे. हे करताना पुलंच्या लिखाणाला धक्का लागणार नाही, याची काळजीही घेतली आहे. कथेचा भाग म्हणून या सिनेमात साक्षात पु. लं. देशपांडे दिसणार आहेत. अर्थात त्यांनी या सिनेमात अभिनय केला आहे, असेही आपण म्हणू शकतो. ग्राफिक्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही ते साध्य केले आहे. पुलंच्या जुन्या सिनेमातील शॉट्स घेऊन ही किमया आम्ही साधली आहे.''

समीर नाईक दिग्दर्शित या सिनेमात वैभव मांगले, रमेश देव, भालचंद्र कदम, प्रदिप पटवर्धन, किशोरी अंबिये, उदय सबनीस या कलाकारांसमवेत 89 कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. तंत्रज्ञानाच्या साह्याने घडणारे पुलंचे दर्शन 15 सेकंदांचे असणारेय. येत्या मे महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.