आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतला आहे \'रंग रसिया\', जाणून घ्या त्यांच्याविषयी बरेच काही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- राजा रवि वर्मा आणि रंग रसिया सिनेमातील एक सीन)
दिग्दर्शक केतन मेहता यांनी दिग्दर्शित केलेला आणि ब-याच काळापासून चर्चेत असलेला रंग रसिया हा सिनेमा उद्या थिएटरमध्ये दाखल होत आहे. बोल्ड विषय असलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला 2008 मध्ये सुरुवात झाली होती.
मात्र पडद्यावर यायला या सिनेमाला तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा आणि नंदना सेन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या जीवनपटावर बेतला असल्याचे म्हटले जात आहे. सिनेमात रणदीप राजा रवी वर्मांच्या भूमिकेत झळकणार आहे.
जाणून घेऊया ज्यांच्या आयुष्यावर रंग रसिया हा सिनेमा बेतला आहे, त्या राजा रवी वर्मा यांच्या जीवनाबद्दल...
कोण होते राजा रवी वर्मा?
राजा रवी वर्मा हे प्रसिध्द भारतीय चित्रकार होते. त्यांनी आपल्या कलाकृतींमध्ये भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे उत्कृष्ट चित्रण केले. हिंदू महाकाव्य आणि धर्मग्रंथावर आधारित चित्र ते बनवत असे. हिंदू पुराणांचा मोठा प्रभाव त्यांच्या चित्रांमध्ये दिसून येतो.
राजा रवी वर्मा यांचा जन्म 29 एप्रिल 1848मध्ये केरळच्या किलिमानूर या छोट्या गावात झाला होता. 5 वर्षांचे असताना त्यांनी घरातील भिंतीवर चित्र रेखटण्यास सुरुवात केली होती. त्यांचे चुलते (काका) राजा वर्मा यांनी राजा रवी वर्मा यांच्यातील सुप्त गुण ओळखला. त्यांनी रवी वर्मा यांना चित्रकलेसाठी प्रोत्साहित केले.
रवी वर्मा यांनी चित्रकार अलाग्री नायडू आणि परदेशातील चित्रकार थियोडोर जेन्सन यांच्याकडून शिक्षण घेतले होते. दोघेही यूरोप शैलीचे चित्रकार होते. रवी वर्मा यांना भारतीय चित्रकला शैली शिकण्यासाठी जवळपास 30 वर्षे लागली. त्यांना पौराणिक कथांवर आधारित चित्र रेखटणे आवडत होते. पौराणिक कथेमधील वेशभूषा हूबेहूब रेखाटण्यासाठी त्यांनी अनेक देशांची भ्रमंती करून शिक्षण घेतले होते.
राजा रवी वर्मा यांच्या कलाकृतींना तीन मुख्य श्रेणींमध्ये गणले जाते.
१- प्रतिकृती किंवा पोर्ट्रेट
२- मानवीय आकाराचे चित्र
३- ऐतिहासिक किंवा पौराणिक कथेशी निगडीत चित्र
जनसामान्यांमध्ये रवी वर्मा यांची ओळख ऐतिहासिक पेंटीग्स आणि देवी देवतांचे चित्र रेखाटण्यामुळे झाली होती. आपल्या कौशल्यामुळे ते सर्वोत्कृष्ट चित्रकाराच्या रुपात ओळखले जाऊ लागले होते. आतापर्यंत त्यांच्यासारखे जिवंत चित्र रेखाटणारा चित्रकार झाला नाही. राजा रवी वर्मा यांचे 2 ऑक्टोबर 1906मध्ये निधन झाले.
जगात रवी वर्मा यांच्या चित्रातून तयार करण्यात आलेली एक महागडी साडीदेखील प्रसिध्द आहे. या साडीला 12 रत्न आणि धातू जडलेले आहेत. 40 लाखांची ही साडी जगातील सर्वात महाग साडी म्हणून ओळखली जाते. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या साडीला सामील करण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राजा रवी वर्मा यांचे जिवंत दिसणा-या कलाकृती..