आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सत् ना गत्\'मधून या भोजपुरी अभिनेत्रीची होतेये मराठी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशील अभिनयसाठी वेगळी ओळख असणारी भोजपुरीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणजे पाखी हेगडे. 45हून अधिक भोजपुरी सिनेमात झळकलेल्या पाखीला गंगा मैय्या या सिनेमता सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबतदेखील अभिनय केला आहे. भोजपुरी सिनेमात स्वतःचा ठसा उमटवल्यानंतर कन्नड भाषिक असलेली पाखी 'सत् ना गत्' या सिनेमाद्वारे मराठी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेत आहे.

राजन खान यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित 'सत् ना गत्' हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला रिलीज होतोय. याचनिमित्ताने पाखी हेगडेबरोबर केलेली ही खास बातचित...