आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Government Ban On Promo Of Ek Tha Tiger

सलमानच्या चित्रपटावर आयएसआयला बदनाम करण्याचा आरोप, पाकिस्तानात चित्रपट बॅन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि कतरिना कैफच्या आगामी 'एक था टायगर' या चित्रपटाचे प्रोमो दाखवण्यास पाकिस्तानने त्यांच्या केबल ऑपरेटरांवर बंदी घातली आहे. आयएसआयला बदनाम करण्याचा बॉलिवूडचा डाव असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणने गेल्या आठवड्यात तेथील सगळ्या टीव्ही चॅनल आणि केबल नेटवर्कला एक पत्र पाठवले होते. या पत्रात चित्रपट आयएसआय आणि रॉवर आधारित असून आयएसआयची प्रतिमा खराब करण्याचा चित्रपटाचा उद्देश असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
जोपर्यंत पाकिस्तानी सेंसॉर बोर्ड चित्रपटाला ग्रीन सिग्नल देत नाही, तोपर्यंत वाहिनी आणि केबल नेटवर्कवर चित्रपटाचे प्रोमो दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात सलमान खानने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.
कतरिनाला तोकड्या कपड्यात बघून चिडला सलमान, पहिल्यांदा शिवीगाळ, नंतर केली मारहाण !
PHOTOS : तीन वर्षांनंतर एवढ्या जवळ आले कॅट-सलमान
कॅट म्हणते, सलमान आता तरी लवकर लग्न कर !