आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Pallavi Sharda, Actress Of 'Hawaizaada' Movie

चिमुकल्या भाच्यासोबत वेळ घालवते ही अभिनेत्री, ऑस्ट्रेलियन सिनेमात केले आहे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः भाच्यासोबत पल्लवी शारदा)
मुंबई- 'हवाईजादा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमात आयुष्मान खुराणासोबत पल्लवी शारदा मुख्य भूमिकेत झळकली आहे. सितारा नावाची व्यक्तिरेखा तिने या सिनेमात साकारली आहे. लीड अॅक्ट्रेस म्हणून पल्लवीचा हा दुसरा हिंदी सिनेमा आहे.
पल्लवीने या सिनेमात आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. 'दिल तोडने की मशीन' या गाण्यावर तिने उत्कृष्ट नृत्य सादर केले आहे.
divyamarathi.comला दिलेल्या एका मुलाखतीत पल्लवी सांगितले होते, की वयाच्या दहाव्या वर्षी तिने अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासमोर परफॉर्म केले होते. त्यावेळी शबाना यांनी पल्लवीचे नृत्य बघून म्हटले होते, की जर पल्लवीने त्यांना नृत्य शिकवले तर त्यांचे करिअर आणखी इम्प्रूव्ह होईल. पल्लवीने शबाना यांच्यासमोर शेक्सपिअरच्या एका कथेवर भरतनाट्यम आणि बॉलिवूड स्टाइल डान्स केला होता. पल्लवीने मेलबर्न येथून क्लासिकल, भांगडा आणि बॉलिवूड डान्सचे धडे गिरवले आहेत.
शाहरुख खानच्या सिनेमातून केले पदार्पण
पल्लवीने शाहरुख खान स्टारर 'माय नेम इज खान' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात तिने साजिदा खान ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर 'दस तौला', 'वाकअवे', 'लव ब्रेकअप जिंदगी', 'हीरोइन' या सिनेमात छोटेखानी भूमिकेत पल्लवी झळकली. लीड अॅक्ट्रेसच्या रुपात 'बेशरम' हा तिचा पहिला सिनेमा होता. याशिवाय 'सेव योर्स लेग' या ऑस्ट्रेलियन सिनेमात पल्लवीने काम केले आहे.
लहान भाच्यासोबत खेळणे आहे पसंत...
पल्लवीला तिचा थोरला भाऊ अंकुर शारदाच्या मुलासोबत खेळणे पसंत आहे. आपल्या फावल्या वेळात ती भाच्यासोबत भरपूर धमाल मस्ती करते. हवाईजादा हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी पल्लवीने आपल्या भाच्यासोबतचा एका फोटो ट्विटरवर शेअर करुन लिहिले होते, "My beautiful nephew has become a #Hawaizaada!!!". याशिवाय इंस्टाग्राम अकाउंटवरसुद्धा पल्लवीची तिच्या भाच्यासोबतची अनेक छायाचित्रे बघायला मिळतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पल्लवी शारदाची तिच्या सोशल अकाऊंटवरुन घेण्यात आलेली खास छायाचित्रे...