आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा परेश रावल यांचे विनोदी चेहरे, प्रत्येक भूमिकेत आणतात जिवंतपणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा अभिनेता परेश रावल आज आपला 64वा वाढदिवस साजरा करत आहेत. 30 मे 1950 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला. परेश यांना सुरूवातीला इंजिनीअर बनण्याची इच्छा होती. परंतु त्यांना त्यापेक्षा जास्त अभिनयाच्या क्षेत्राची ओढ होती. म्हणून जवळपास वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये सिव्हिल इंडिनिअरच्या रुपात काम मिळवण्यासाठी धडपड रकरत असताना बॉलिवूड क्षेत्राकडे वळले.
त्यांनी 1984मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 'होली' सिनेमामधून केली. परेश यांचे मुख्य सिनेमे 'मेरे बाप पहले आप', 'भूल भुलैय्या', 'वेलकम', 'हॅट्रीक' , 'मालामाल-वीकली', 'भागम भाग', 'फिर हेरा फेरी', '36 चायना टाऊन', 'गोलमाल', 'ये तेरा घर ये मेरा घर'. 'ओह! माय गॉड' इत्यादी सिनेमे सामील आहेत. परेश आतापर्यंत तीन वेळा फिल्म फेअरचे मानकरी ठरले आहेत. बॉलिवूडचे सुपरस्टार परेश रावल यावर्षीच्या लोकसभा निवडणूकित निवडून आल्याने खासदार झाले आहेत. त्यानी गुजरातच्या पूर्व अहमदाबादमधून खासदारकी मिळवली आहे. ॉ
परेश यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही विनोदी भूमिकेतील छायाचित्रे बघूया, त्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...