मुंबई - परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर सध्या
आपल्या आगामी 'दावत-ए-इश्क' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. गुरुवारी हे दोघे यशराज स्टुडिओत सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पोहोचले होते. यावेळी परिणीती भिजत प्रमोशनस्थळी दाखल झाली तर आदित्यने हातात मोठी छत्री पकडली होती. येत्या 19 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
या सिनेमात आदित्यने लखनवी कूकची भूमिका साकारली आहे, तर परिणीती हैदराबादी युवतीच्या भूमिकेत आहे. अनुपम खेर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हबीब फैजल या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा प्रमोशनवेळी क्लिक करण्यात आलेली परिणीती-आदित्यची निवडक छायाचित्रे...