(मुंबईतील मोहम्मद अली रोडवर जेवणाचा आनंद लुटताना परिणीती चोप्रा आणि आदित्य रॉय कपूर)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या आगामी 'दावत-ए-इश्क' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी भरपूर मेहनत घेत आहे. यासाठी तिला तिचा को-स्टार आदित्य रॉय कपूरसुद्धा मदत करतोय. अलीकडेच या दोघांना सिनेमाचे प्रमोशन करताना खाण्यावर विशेष मेहनत घ्यावी लागली. दोघे शुक्रवारी रात्री मुंबईतील मोहम्मद अली रोडवर फेरफटका मारताना दिसले.
मोहम्मद अली रोडवरील एका ओपन फूड स्टॉलवर हे दोघे वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारताना दिसले. यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज डिशेश होत्या. परिणीती खाण्याची शौकीन आहे. त्यामुळे तिने जेवणाची चांगलीच मजा लुटली. खरं तर दावत-ए-इश्क या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये परिणीती सतत खाताना दिसते, तर आदित्य एका हॉटेलमध्ये काम करताना दिसतो. म्हणजेच हा सिनेमा दावतशी निगडीत असल्याचे आपल्या लक्षात आलेच असेल. त्यामुळे हे दोघेही खाऊन-पिऊन आपल्या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत.
'दावत-ए-इश्क' हा सिनेम हबीब फैजल यांनी दिग्दर्शित केला आहे तर आदित्य चोप्रा या सिनेमाचा निर्माता आहे. सिनेमात आदित्य रॉय कपूरच्या पात्राचे नाव हैदर तर परिणीतीचे नाव गुलरेज कादिर आहे. येच्या 5 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जेवणाचा आनंद घेत असलेल्या आदित्य आणि परिणीतीची ही खास छायाचित्रे...