आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Chopra And Aditya Roy Kapur Promote Daawat E Ishq

PICS मध्ये पाहा कशा प्रकारे करत आहेत आदित्य-परिणिती \'दावत-ए-इश्क\' चे प्रमोशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर डिनर करताना परिणीति चोपडा आणि आदित्य रॉय कपूर)

मुंबईः परिणीति चोपडा सध्या आपला आगामी चित्रपट 'दावत-ए-इश्क' च्या प्रमोशनसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर तिच्या सोबत आहे. मात्र, या दोघांना चित्रपटाच्या प्रमोशनऐवजी खाण्यावरच जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. हे दोघे शुक्रवारी मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर फिरताना दिसले.
मोहम्मद अली रोडवर या दिवसात दोघांनी मिळून एका ओपन फूड स्टॉलवर जेवण केले. यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही डिशेसचा समावेश होता. परिणितीतर पहिलेपासूनच खाण्याची शौकीन आहे, त्यामुळे तीने हे ओपनस्पेस डिनरची मस्त मजा घेतली. 'दावत-ए-इश्क' च्या ट्रेलरमध्येही परिणिती खातानाच दिसते, मात्र आदित्य कोणत्यातरी हॉटेलमध्ये काम करताना दिसतो. म्हणजेच काय तर हा 'मेजवानी' (दावत) शी निगडीत आहे. त्यामुळे हे दोघे जेथे कुठे जातात तेथे खाण्यासोबतच चित्रपटाचे प्रमोशनही करत आहेत.
'दावत-ए-इश्क' चे दिग्दर्शन हबीब फैजल यांनी केले असून चित्रपटाचे निर्मिती आदित्य चोपडाने केली आहे. चित्रपटात आदित्यने तारिक हैदर नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे, तर परिणिती गुलरेज कादीर नावाच्या तरूणीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

पुढील स्लाईडवर पाहा... चित्रपटाचे प्रमोशन करताना परिणीति-आदित्यच्या डिनरचे फोटो...