आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Parineeti Chopra Movie \'Kill Dil\' Release This Friday.

शाळेतील हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी होती परिणीती, पाहा बालपणीचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परिणीती चोप्रा: बालपणीचे आणि आताचे छायाचित्र)
मुंबईः या शुक्रवारी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'किल दिल' हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात तिच्या अपोझिट अभिनेता रणवीर सिंह झळकणार आहे. परिणीतीने आत्तापर्यंत पाच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.
परिणीती बी टाऊनमधील अशी एक अभिनेत्री आहे, जिचे सिनेमांशी घनिष्ठ नाते आहे. याचे कारण म्हणजे तिच्या चुलत बहिणी प्रियांका चोप्रा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्रा नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. याशिवाय परिणीतीची आतेबहीण मनारासुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
परिणीतीने अभिनेत्री होणा-यापूर्वी बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांत पदवी प्राप्त केली आहे. शाळेत तिची ओळख हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनीच्या रुपात होती. काही दिवस नोकरी केल्यानंतर तिला सिनेसृष्टीत करिअर करण्याची संधी मिळाली. आत्तापर्यंत परिणीतीचे 'इशकजादे', 'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'शुद्ध देसी रोमान्स', 'हसी तो फसी', 'दावत-ए-इश्क' हे सिनेमे रिलीज झाले आहेत.
परिणीतीचे बालपण..
परिणीतीचे बालपण अगदी सामान्य गेले आहे. ती बालपणापासून खूप खोडकर आणि आपल्या आईवडिलांची लाडकी आहे. तिचे वडील पवन चोप्रा बिझनेसमन आहेत. तिच्या आईचे नाव रीना चोप्रा आहे. परिणीतीला दोन सख्खे भाऊ असून शिवांग आणि सराज ही त्यांची नावे आहेत. परिणीतीचे सुरुवातीचे शिक्षण अंबाला येथील जेजस अँड मेरी शाळेतून झाले. ती शाळेतील हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी होती. दोन्ही भावांपेक्षा परिणीती मोठी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा परिणीतीची बालपणीची खास छायाचित्रे...