आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parineeti Chopra Holidays With Brothers Shares Photos On Instagram

भावांसोबत सुट्यांचा मनसोक्त आनंद घेतेय परिणीती, Instagramवर शेअर केले फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भावांसोबत सुट्या घालवताना परिणीत चोप्रा)
मुंबई- अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मूड फ्रेश करण्यासाठी मनसोक्त सुट्यांचा आनंद घेत आहे. बिझी शेड्यूलमधून वेळ काढून परिणीती मियामीमध्ये सुट्या घालवत आहे. सुट्यांचा आनंद घेत असताना परिणीतीने सोशल मीडियावर अनेक फोटोसुध्दा शेअर केले.
परिणीती आपले भाऊ शिवांग आणि सरजसोबत मियामी आणि स्वित्झर्लंडमध्ये फिरत आहे. कुटुंबसोबत क्वालिटी टाइम घालवत असताना परिणीतीने अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती भावांसोबत मस्ती करताना दिसते आणि ब्रेकफास्ट करत आहे. काही फोटोंमध्ये ती एकटी दिसत आहे. विशेष म्हणजे, जास्तित जास्त फोटोंमध्ये ती विना मेकअप दिसते.
परिणीती नेहमी चाहत्यांना सोशल मीडियावर आपल्या सिनेमा, आऊटिंग आणि सुट्यांविषयी सांगत असते. नोव्हेंबर 2014च्या शेवटीसुध्दा ती लंडनमध्ये सुट्या घालवत होती, तेही फोटो तिने टि्वटरवर शेअर केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परिणीती चोप्राची सुट्या घालवत असतानाची काही छायाचित्रे...