जयपूर: 'दावत-ए-इश्क' सिनेमाच्या प्रचारासाठी निघालेल्या आदित्य-परिणीतीचा दुसरा टप्पा जयपूर होता. अहमदाबादच्या एका हॉटेलमध्ये थांबलेल्या या स्टार्सनी सकाळी काही वेळ जिममध्ये घालवला. ब्रेकफास्ट न करता लंच करण्यासाठी दोघे तेथील प्रसिध्द रेस्तरॉमध्ये पोहोचले आणि गुजराती जायकावर ताव मारला. लंचनंतर दोघे जयपूरकडे रवाना झाले. रस्त्यात दोघे एका ढाब्यावर थांबले. अहमदाबादमधील प्रमोशनने आणि मोठ्या प्रवासाने थकलेली परिणीती ढाब्यावरील बाज दिसताच आराम करायला लागली. त्यानंतर जयपूरमध्ये एका म्युझिकल इव्हिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुनिधी चौहाण आणि जावेद अलीने गाणी गायली. त्यानंतर राजस्थानी डिनर केले.
अजमेरच्या दर्गामध्ये चढवली चादर
'दावत-ए-इश्क'च्या यशासाठी अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि परिणीती चोप्रा यांनी रविवारी (14 सप्टेंबर) सीकरीमध्ये हजरत शेख सलीम चिश्तीच्या दर्ग्यात चादर चढवून मन्नतचा धागा बांधला बांधला. हे दोन्ही कलाकार दुपारी 3 वाजता कडक सुरक्षेत दर्ग्यात पोहोचले होते.
सिनेमा प्रमोशनसाठी जयपूरला पोहोचल्या परिणीती आणि आदित्यशी झालेली बातचीत...
गुल्लूची भूमिका माझ्या व्यक्तिगत आयुष्याला शोभणारी आहे. मी या सिनेमात एका शू सेल्स गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. वास्तवात मी सेल्स मार्केटिंगचे काम मी केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मी फायनान्सचे प्रॉडक्ट विकत होते. आयुष्यातील काही खासगी अनुभव परिणीती आणि आदित्यने शेअर केले. दोघे त्यांच्या 'दावत-ए-इश्क' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी रविवारी जयपूरमध्ये आले होते. दोघे रविवारी जयपूरहून कारमधून आग्र्याला गेले होते. तिथे ताजमहालवर एका कव्वाली कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली.
पहिली कमाई ठेवली सांभाळून- परिणीती
शू सेल्स गर्लची भूमिका साकारणारी परिणीती म्हणते, जेव्हा मला 4 हजार रुपये पहिला पगार मिळाला तेव्हा मी ते पैसे एन्जॉय करण्यात खर्च करण्यापेक्षा सांभाळून ठेवले आहे. त्या कमाईला खर्च केले नाही. कारण
आपण आपल्या गरजांसाठी कमावतो. त्यामुळे कमावलेले पैसे असे खर्च कसे करावे?
किचन सांभाळता येऊ लागले- आदित्य
सिनेमात आचा-याची भूमिका वठवणा-या आदित्यने सांगितले, 'मला स्पेशल डिश बनवता येत नाही, मात्र मॅगी आणि आम्लेट बनवू शकतो. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान डिश बनवता आली नसली तरी किचन कसे सांभाळले जाते ते शिकलो. गॅस कसा ऑपरेट करावा, तवा कसा ठेवावा, किचनची स्वच्छता हे सर्व शिकलो. मी पोळी एका अनुभवी आचा-याप्रमाणे गोल-गोल फिरवू शकतो. हे शिकून मला खूप आनंद झाला.' या सिनेमात आदित्यचे नाव खाण्याच्या पदार्थावर ठेवलेले असावे, मात्र सिनेमात प्रत्येकवेळी तुम्हाला पदार्थच दाखवले जाणार नाहीये. हा एक म्यूझिकल रोमँटिक सिनेमा आहे. सिनेमात प्रत्येकाला स्वत:ची प्रेमकथा दिसून येईल.
'एक पेड एक जिंदगी' अंतर्गत लावली झाडे
दैनिक भास्करच्या 'एक पेड एक जिंदगी' अभियानाअंतर्गत या दोन्ही स्टार्सनी झाडे लावली. दोन्ही कलाकारांनी दैनिक भास्करचे स्टेट ब्रँडच्या प्रमुख मृणाल पुरोहित यांना झाड भेट दिले. त्यासह त्यांनी या अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.
हसरी किंवा चिअरअप गर्ल म्हटलेले आवडेल
बबली नाव मला सन्मानाने घेतल्यासारखे वाटत नाही. मला माहित आहे, लोक मला बबली गर्ल सकारात्मक दृष्टीकोणाने म्हणतात. त्याऐवजी मला हसरी किंवा चिअरअप गर्ल म्हटलेले जास्त आवडेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परिणीती आणि आदित्यची छायाचित्रे...