आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:परिणीतीने लाँच केला चुलत भावाचा पब, प्रियांका चोप्राच्या आईची हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ आणि आई मधू चोप्रा)
पुणेः बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा शनिवारी पुण्यात पोहोचली होती. निमित्त होते तिचा चुलत भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या नवीन पबच्या उद्घाटनाचे. गेल्यावर्षीच सिद्धार्थ चोप्राने पुण्यातच मगशॉट नावाने लाउंज सुरु केले होते. हे लाउंज सिद्धार्थची बहीण प्रियांका चोप्राने लाँच केले होते. लाउंजला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सिद्धार्थने आता पब उघडले आहे. याच पबचे लाँचिंग परिणीतीने केले. यावेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीही हजेरी लावली होती.
सिद्धार्थने आपल्या लाउंज आणि पबविषयी सांगितले, की द मगशॉट कॅफे पाहुण्यांना संपूर्ण दिवसाची डायनिंग आणि कॅफेची सुविधा पुरवतो. येथे आमच्या स्पेशल डिशेजसुद्धा आहेत. आता याच सुविधा आमच्या लाउंजमध्येही उपलब्ध असतील.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा चुलत भावाच्या पबच्या लाँचिंगवेळी क्लिक झालेली परिणीती आणि उपस्थितांची खास छायाचित्रे...