परिणीती चोप्राची आतेबहीण मनारा बी टाऊनमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. 'जिद' या सिनेमाद्वारे मनारा बॉलिवूडमधील
आपल्या करिअरला सुरुवात करत आहे. पहिल्याच सिनेमात टॉपलेस आणि उत्तेजक सीन्स देऊन मनारा प्रसिद्धीझोतात आली आहे. मनाराचा बोल्ड अंदाज बघून तिच्या वयाचा अंदाज तुम्ही बांधू शकता का? जर उत्तर नाही असे असेल तर आम्ही नव्हे तर तिची बहीण परिणीती चोप्रा तुम्हाला तिचे वय किती हे सांगत आहे.
सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच मनाराची बहीण परिणीतीने तिच्या वयाचे रहस्य उघड केले आहे. परिणीतीला मनाराच्या फिल्म इंडस्ट्रीतील पदार्पणाविषयी प्रश्न विचारले असता, तिने तिचे तोंडभरुन कौतुक केले, सोबतच तिच्याविषयीचे एक रहस्यसुद्धा उघड केले.
परिणीती म्हणाली, ''मी आणि मनारा एकत्र लहानाच्या मोठ्या झालो. ती माझ्यापेक्षा वयाने दोन वर्षे मोठी आहे. मात्र माझ्यानंतर ती इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, की ती आपल्या पहिल्याच सिनेमात बोल्ड अंदाजात दिसेल. तिच्या सिनेमाचा प्रोमो बघून मी तिला फोन केला आणि तू सेक्सी दिसत आहे, असे आवर्जून सांगितले. माझा जन्म 1988चा आहे, तर मनारा जन्म 1986मध्ये झाला."
आता मनाराने आपले वय लपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती ते लपवू शकणार नाहीये. कारण परिणीतीने मनाराचे करिअर सुरु होण्यापूर्वीच तिचे बर्थ सर्टिफिकेट सादर केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा परिणीतीपेक्षा वयाने दोन वर्षे मोठी असलेल्या मनाराचा 'जिद' या सिनेमातील बोल्ड अंदाज...