आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Parveen Babi's Life Facts And Her Love Story With Mahesh Bhatt

महेश भट्टपासून विभक्त होणे सहन करू शकली नव्हती परवीन, एकांतात घालवले आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः महेश भट्ट आणि परवीन बाबी)
हिंदी सिनेसृष्टीत 70 च्या दशकात अशा अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली, ज्यांनी केवळ स्वतःची वेगळी स्टाइल स्टेटमेंटच निर्माण केली नाही, तर अभिनेत्रींची स्टाइलसुद्धा बदलली. आम्ही बोलतोय ते गतकाळातील ग्लॅमरस गर्ल परवीन बाबी हिच्याविषयी. तिची आज 10 पुण्यतिथी आहे. 20 जानेवारी 2005 रोजी परवीनने या जगाचा निरोप घेतला. आपल्या राहत्या घरात ती मृतावस्थेत आढळून आली होती.
70 ते 80च्या दशकांत मोठ्या पडद्यावर स्लीवलेस ब्लाउजसोबत साडी नेसण्याचा ट्रेंड प्रसिध्दीस आला होता. परंतु परवीनने ग्लॅमरस स्टाइलला स्वीकारून अभिनेत्रींचे एका चौकटीतले रुपच बदलून टाकले. भूरळ घालणा-या मोठ-मोठ्या डोळ्यांच्या परवीनची प्रतिमा एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच राहिली. 1976 ते 80च्या दरम्यान ती इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये दुस-या स्थानावर होती.

रुपेरी पडद्यावर आपल्या खोडकर अंदाजासाठी ओळखल्या जाणा-या या बोल्ड अभिनेत्रीचे आयुष्य कॅमे-यासमोर जितके चांगले होते, तितकेच ख-या बेरंगी होते. परवीनच्या आयुष्यात दु:खांचे मोठे डोंगरच होते. परंतु महेश भट्ट यांच्यासोबत नाते तुटल्यानंतर तिच्या आयुष्यातील तणाव अधिकच वाढला. 20 जानेवारी 2005मध्ये दक्षिण मुंबईच्या आपल्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळून आली होता. मृत्यूच्या दोन दिवसांनी ती जगात नसल्याचे सर्वांना कळले होते.
पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या परवीनच्या खासगी आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी...