(शूटिंग सेटवर रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा)
बॉलिवूडचे एक्स लव्हर्स रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 'दिल धडकने दो' या आगामी सिनेमात हे दोघे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांपासून अंतर ठेऊन वागत होते. मात्र आता या दोघांमध्ये पॅचअप झाल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर आणि अनुष्का यांना एक सीन शूट करायचा होता. हे दोघे एकमेकांसमोर येणार की नाही, असा प्रश्न सिनेमाच्या टीमला पडला होता. मात्र रणवीर आणि अनुष्काने आपापसांतील वाद बाजुला सारुन प्रोफेशनॅलिझम जपत सीन पूर्ण केला. शिवाय एकमेकांसोबत मित्रांसारखे वागले. दोघांना बघून त्यांच्यात कित्येक दिवसांपासून अबोला असल्याचे कुणालाही भासले नाही.
'बँड बाजा बारात' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि अनुष्का यांच्यात सूत जुळले होते. त्यानंतर हे दोघे 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमात झळकले. या सिनेमानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. यादरम्यान रणवीरचे नाव दीपिका पदुकोणसोबत तर अनुष्काचे नाव क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत जोडले गेले. अद्याप रणवीर आणि अनुष्काने आपल्या नवीन नात्याविषयी कुठेही वाच्यता केलेली नाही.
'दिल धडकने दो' या सिनेमात रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मासह
प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील रणवीर आणि प्रियांकाची बरीच छायाचित्रे समोर आली, मात्र या छायाचित्रांमध्ये अनुष्का गैरहजर होती. मात्र आता पहिल्यांदाच अनुष्काचीसुद्धा शूटिंगदरम्यानची छायाचित्रे समोर आली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंगवेळी क्लिक झालेली स्टार्सची ही छायाचित्रे...