आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pehlaj Nihalani Is The New Chairperson Of Censor Board

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक पहलाज निहलानी यांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पहलाज निहलानी)
सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक पहलाज निहलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी हस्तक्षेपाचा आरोप करत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांवर भाजप सरकारने नव्या नियुक्त्या केल्या आहेत. 'डेरा सच्चा सौदा' संस्थानाचे प्रमुख व स्वयंघोषित संत गुरमीत रामरहीम सिंग इन्सान यांच्या 'एमएसजी: मेसेंजर ऑफ गॉड' चित्रपटाला हिरवा कंदील दिल्याचे निमित्त करत सेन्सॉर बोर्डाच्या प्रभारी अध्यक्षा लीला सॅमसन व अन्य नऊ सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले होते.
पहलाज निहलानी यांच्यासह अन्य नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निहलानी यांच्या अन्य सहकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'विवेक' साप्ताहिकाचे संपादक रमेश पतंगे, भाजपच्या सरचिटणीस वाणी त्रिपाठी, भारताच्या फाळणीवर आधारीत 'पिंजर' चित्रपट बनविणारे व चाणक्य मालिकेचे निर्माते चंद्रप्रकाश द्विवेदी, आसामी अभिनेते व भाजपचे मागील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार जॉर्ज बेकर, एनआरआय दिग्दर्शकासाठी मोदींवर आधारीत चित्रपटाची पटकथा लिहिणारे मिहिर भुता आणि गुजरात केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सय्यद अब्दुल बारी यांचा समावेश आहे.
याशिवाय, निर्माते अशोक पंडित, निर्माती, अभिनेत्री जीविता आणि नाट्यलेखक एस. व्ही. शेखर यांनाही सेन्सॉर बोर्डावर स्थान मिळाले आहे.
चित्रपट निर्माते असलेल्या निहलानी यांनीच लोकसभा निवडणुकीपूर्वी 'हर घर मोदी' ही सहा मिनिटांची व्हिडिओ क्लिप बनविली होती.