आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लायसन्सची मुदत संपूनही दिल्लीमध्ये चालतोय अर्जुन रामपालचा बार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: अर्जुन रामपाल
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या लाउंज बार आणि रेस्तरॉ 'लेप'ने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्राइम ब्रांचच्या नारकोटिक्स यूनिटने शुक्रवारी (25 जुलै) रात्री 1.13 वाजता धाड टाकली. बार एक वाजेनंतरही चालू असून त्यामध्ये म्यूझिक चालू होते. प्रसिध्द इंग्रजी वर्तमानपत्र मेल टुडेनुसार, तपासणीत बारच्या लायसेन्सची मुदत संपली होती, तरीदेखील बार चालू असल्याचे प्रकरण समोर आले. सुत्रांच्या सांगण्याप्रमाणे, 'बार विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.'
बार विरोधात दंडात्मक कारवाई

इंग्रजी वर्तमानपत्र मेल टुडेनुसार, धाड टाकल्यानंतर क्राइम ब्रांचने त्वरीत चाणक्य पोलिस स्टेशनला कळवले. त्यानंतर बार विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एका सीनिअर पोलिस अधिका-याने याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र काही अधिका-यांना याविषयी काहीच ठाऊक नसल्याचेही कळते.
लायसेन्सची मुदत संपली तरीदेखील चालू आहे बार
धाड टाकल्यानंतर पोलिसांनी 'लेप'च्या साउंड सिस्टम जप्त केले. तपासणीत माहित झाले, की बारच्या लायसेन्सची मुदत संपली असूनही बार चालवले जात आहे. क्लबचा दावा आहे, की त्यांनी लायसेन्सच्या नुतनीकरणासाठी निवेदन दिले आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार, पोलिस विभागातील लायसेन्स विभाला एक पत्र लिहिण्यात आले, त्यामध्ये बार विरोधात कडक कारवाई करण्यात यावी असा उल्लेख करण्यात आला आहे. चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये ज्या पोलिसांवर या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे त्यांच्या विरोधात कारवाईविषयीसुध्दा सांगण्यात आले. पोलिस सुत्रांचे सांगणे आहे, की अधिकारी दिल्ली पोलिसच्या लायसेन्स यूनिटकडून बारच्या वास्तविक स्थितीची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे.
रामपाल म्हणाला, नियमांना दुर्लक्षित केले नाही
'मेल टुडे'नुसार, अर्जुन रामपाल या घटनेचे स्पष्टीकरण देताना म्हणाला, क्लबने नियमांचे उल्लंघन केले नाही. रामपालने ऑगस्ट 2009मध्ये नाइटक्लब लाँच केला होता. अर्जुनने सांगितले, 'आम्ही शुक्रवारी रात्री 12.30 वाजता म्यूझिक बंद केले होते. परंतु आमच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. यासंबंधी आम्ही कोर्टात जाणार आहोत.' मात्र इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, 'काही तासांनी अर्जुनने फोन करून सांगितले, की बार विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाहीये.'
एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले, 'लेपच्या लायसेन्सची मुदत संपली होती. आम्ही सर्व कागदपत्रे आमच्या ताब्यात घेतले असून प्रकरणाची तपासणी सुरू आहे.'
काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिस आयुक्त बी .एस. यांनी सर्व संयुक्त पोलिस उपायुक्तांना सुचित केले होते, की डिस्कोथेक आणि पबमध्ये 12.30 वाजेनंतर म्यूझिक आणि डिस्कोथेक हॉटेल आणि रेस्तरॉ 1 वाजेपर्यंत बंद झाले पाहिजेत. ही जबाबदारी संयुक्त पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस उपायुक्त यांना सोपवण्यात आली होती. त्यांना आपआपल्या परिसरात ही सूचना लागू करण्याचे आदेश देण्यात आले होते.