आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: असे आहे जॉनचे घर, पाहताच क्षणी खिळतील कुणाच्याही नजरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता जॉन अब्राहमचे घर)
मुंबईः अभिनेता जॉन अब्राहम आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडेलिंग क्षेत्रातून अभिनयाकडे वळलेल्या जॉनची गणना बी टाऊनमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. जॉनने आपल्या करिअरची सुरुवात 2003मध्ये 'जिस्म' या सिनेमाद्वारे केली होती.
11 वर्षांच्या करिअरमध्ये जॉनने जवळजवळ 39 सिनेमांमध्ये काम केले. यावर्षी त्याचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र पुढील वर्षी त्याचे बरेच सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत. जॉनने आत्तापर्यंत 'धूम', 'जिंदा', 'वॉटर', 'दोस्ताना', 'फोर्स', 'शूटआउट एट वडाला', 'मद्रास कैफे' हे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. मॉडेल आणि अभिनेत्यासोबतच जॉनने निर्माता म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'विकी डोनर' या सिनेमाचा जॉन निर्माता होता. या सिनेमा बॉक्स ऑफिसवर यश मिळवले होते.
सुंदर घराचा मालक आहे जॉन...
जॉन एका सुंदर आशियानाचा मालक आहे. मुंबईस्थित त्याच्या घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे. या घराचे इंटेरियर जॉनचे वडील अब्राहम जॉन आणि भाऊ एलनने केले आहे. जॉनचे हे घर पाच हजार चौ. फुटात असून दोन मजली आहे. घरातील बेडरुम, किचन, ड्रॉईंग रुम, डायनिंग रुम आणि हॉलची छायाचित्रे बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जॉनच्या घराची निवडक छायाचित्रे...