आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'बॉम्बे वेलवेट'च्या स्क्रिनिंगला अनुष्काने रणबीरसोबत कापला केक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा)
मुंबईः शुक्रवारी म्हणजेच 1 मे रोजी अभिनेत्री अनुष्का शर्माने आपला 27 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवस तिने आपल्या आगामी 'बॉम्बे वेलवेट'च्या टीमसोबत एन्जॉय केला. बर्थ डे गर्ल अनुष्काने तिचा को-स्टार रणबीर कपूरसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.
मुंबईतील सनी सुपर साउंड स्टुडिओत 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 15 मे रोजी रिलीज होणार आहे. या स्क्रिनिंगला गौरी खान, अदिती राव हैदरी, ऋषी कपूर, करण जोहर, राधिका आपटे, दिग्दर्शक विकास बहल, के.के. मेनन यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले होते.
या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यासह करण जोहर, के.के. मेनन, रवीना टंडन आणि मनीष चौधरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पु़ढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बॉम्बे वेलवेट'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे..