आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्शदने रिपोर्टरची काढली छेड, म्हणाला, 'तुझे डोके खराब आहे'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्शद वारसी)
मुंबई- कॉमेडीने भरलेला अर्शद वारसी आणि जॅकी भगनानी अभिनीत 'वेलकम टू कराची' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाची संपूर्ण टीम ट्रेलर लाँच करण्यासाठी मुंबईच्या एका थिएटरमध्ये पोहोचली होती. यावेळी मुख्य अभिनेता अर्शद वारसी, जॅकी भगनानी आणि लॉरेन गॉटलिएब उपस्थित होते. तिनही स्टार्स फनी टी-शर्ट परिधान करून धमाल-मस्ती करताना दिसले.
नेहमी विनोदी अंदाजात बोलणारा अर्शदने यावेळी असे वक्तव्य केले, ते ऐकून सर्वजण हैराण झाले. अर्शद वारसीने मीडियाच्या प्रश्नावर उत्तर अगदी उन्मत्तपणे उत्तर देत त्यांना लाजीरवाणे केले.
झाले असे, की एका रिपोर्टरच्या तोंडून फिल्म एवजी फिलम असा शब्द निघाला. यावर अर्शदने त्याला विनोदी अंदाजात छेडत म्हणाला, 'हा फिलम काय असते?' याच्या प्रश्नामध्ये रिपोर्टरने सांगितले, की जसे तुमचा घसा खराब झाल्यावर चुक होते, तसेच माझ्यासोबत घडले आहे. रिपोर्टरचे उत्तर ऐकून अर्शद भडकला आणि म्हणाला, 'माझा तर घसा खराब आहे, पण तुझे डोके खराब आहे.'
लाँचिंग इव्हेंटमध्ये दिग्दर्शक आशीष आर मोहनसोबत निर्माता वासू भगनानी, निर्माते डेव्हिड धवन, सिनेमा वितरक अनिल थडानीसुध्दा उपस्थित होते. हा सिनेमा 21 मे रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'वेलकम टू कराची'च्या ट्रेलर लाँचिंगचे फोटो...