आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTOS: Glamorous Smita Tambe\'s \'72 Miles\' Painful Journey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जाणून घ्या, ग्लॅमरस स्मिताचा \'72 मैल...\'चा कष्टमय प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही कलाकार आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करतात आणि स्वतःला सिद्ध करतात. स्मिता तांबे ही एक अशीच कष्टाळू आणि मिळेल ती भूमिका आव्हान म्हणून स्विकारणारी अभिनेत्री. स्मिता मूळ साता-याची. पुण्यात अनेक वर्ष राहून, सिनेइंडस्ट्रीत दाखल होण्यासाठी ती मुंबईत गेली. तिने मालिका आणि सिनेमात काही भूमिका निभावून आपली कारकिर्द सुरु केली.

'धुसर', 'पांगिरा', 'जोगवा' या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता स्मिता अशोक व्हटकर यांच्या '72 मैल' या कांदबरीवर आधारित आणि राजीव पाटील दिग्दर्शित '72 मैल एक प्रवास' या सिनेमाद्वारे ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात स्मिताने राधाक्काची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. राधाक्काच्या भूमिकेसाठी स्मिताने किती कष्ट घेतले हे जाणून घेतल्यास तुम्हीही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ग्लॅमरस दिसणा-या स्मिताने या भूमिकेसाठी घेतलेली कसून मेहनत आमच्याबरोबर शेअर केली.

'72 मैल एक प्रवास'च्या स्मिताच्या कष्टमय प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...