आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँचिंग इव्हेंटमध्ये कंगना म्हणाली, 'दीपिका-सोनम नव्हे, मी असेल नेक्स्ट जनरेशनची सुपरस्टार'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बुक लाँचिगवेळी कंगना राणावत)
मुंबई- मंगळवारी (6 एप्रिल) हॉटेल ताज लेंड्स अँडमध्ये प्रसिध्द पत्रकार अनुपमा चोप्रा यांच्या 'फ्रंट रो- कन्व्हर्सेशन ऑन सिनेमा' या पुस्तकाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये अभिनेत्री कंगना राणावत पोहोचली होती.

नेहमी सरळ आणि बिनधास्त वक्तव्याने फिल्म इंडस्ट्रीत प्रसिध्द असलेल्या कंगनाने स्वत:ला पुढच्या पिढीतील सुपरस्टार म्हणून संबोधले आहे.
इव्हेंटमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसलेल्या कंगनाने डिझाइनर पल्लवी मोहनचा आऊटफिट परिधान केला होता. तिने निळ्या रंगाचा फ्लोरल टॉपसोबत स्कर्ट कॅरी केले होते. या ड्रेससोबत कंगनाने शूज घातलेले होते.
लाँचिंगवेळी माध्यमांशी बातचीत करताना कंगना म्हणाली, 'मी यशस्वी नव्हते तेव्हा कुणीच माझी मुलाखत घेत नव्हते. आता एकच प्रश्न विचारला जातो, सोनम आणि दीपिकापैकी कोण पुढच्या पिढीची सुपरस्टार अभिनेत्री राहणार आहे.' कंगनाने या प्रश्नाचे उत्तर असे दिले, 'ना दीपिका ना सोनम, पुढच्या पिढीची सुपरस्टार मी असेल.'
कंगनाने नेहमी सांगते, की अवॉर्ड शोमध्ये जाणे तिला आवडत नाही. तिच्या सांगण्यानुसार, 'मी खूप लाजाळू आहे. मला भीतीचा झटका येतो आणि घाम फुटतो. त्यामुळे मी अवॉर्ड शोमध्ये जात नाही.'
अनुपमा चोप्रा यांच्या 'फ्रंट रो- कन्व्हर्सेशन ऑन सिनेमा' या पुस्तकाच्या लाँचिंगवेळी निर्माते विधु विनोद चोप्रा पत्नी अनुपमा चोप्रा यांच्यासह आले होते. रंगोली राणावत (कंगनाची बहीण), दलिप ताहिलसुध्दा या इव्हेंटमध्ये पोहोचले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पुस्तक लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...