आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS Of Pre Wedding Party Given By Sanjay Hinduja

लंडनच्या अब्जाधीशाने दिली Pre Wedding पार्टी, जमली सेलेब्सची मांदियाळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ)
मुंबई- शूक्रवारी लंडन येथील अब्जाधीश संजय हिंदुजा यांनी प्री वेडिंग पार्टीचे आयोजन केले होते. प्रसिद्ध फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांची धाकटी बहीण अनू महतानीसोबत संजय हिंदुजा लग्नगाठीत अडकणार आहे. यानिमित्ताने ही पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या पार्टीत बोनी कपूर, पूनम ढिल्लन, अनिल कपूर आणि त्यांच्या पत्नी सुनीता, जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर, माधुरी दीक्षित नेने आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने, अनु मलिक आणि त्यांच्या पत्नी, लव सिन्हा, कुश सिन्हा आणि त्याची पत्नी तरुणासह बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकारण आणि बिझनेस क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या पार्टीत हजेरी लावली होती. शायना एनसी, नितिन गडकरी, मिलिंद देवडा, बिझनेसमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, यश बिरला या पार्टीत दिसले.
संजय हिंदुजा आणि अनु महतानी यांच्या लग्नाचे कार्यक्रम लीला पॅलेस, शेरेटन पॅलेस रिजॉर्च अँड स्पा उदयपूर आणि उद्यपूर येथील जगमंदिर पॅलेस या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा संजय हिंदुजा आणि अनू महतानी यांच्या प्री वेडिंग पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...