आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटाणे पुन्हा दिग्दर्शनाकडे: चित्रपटात पैसे घालवण्यापेक्षा कार्यक्रमातून मिळवणेच योग्य’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट निर्मिती करणे सोपे नाही आणि मला ते जमतही नाही. पैसे खर्चच होत असतात त्यामुळेच मी ‘सुरवंता’नंतर चित्रपट निर्मितीच्या फंदात पडलो नाही. चित्रपट निर्मिती करून पैसे घालवण्यापेक्षा कार्यक्रम करून पैसे मिळवणे मला योग्य वाटते, असे मत प्रख्यात साहित्यिक आणि चित्रपट निर्माते- दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे 19 वर्षानंतर ते जाती व्यवस्थेवर आसूड ओढणारा ‘सरपंच भगीरथ’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहेत.

नव्या चित्रपटाबाबत फुटाणे म्हणाले, आसाराम लोमटे यांची कथा वाचली होती. त्यांची ती पहिलीच कथा असूनही त्यांनी जाती व्यवस्थेचे अचूक निरीक्षण त्यात नोंदवले आहे. ती कथा वाचली तेव्हाच मला त्यात चित्रपटाची बीजे असल्याचे जाणवले. एक दिवस उदयदादा लाड यांचे पुत्र शिवकुमार लाड माझ्याकडे आले आणि त्याने मला चित्रपट दिग्दर्शित करण्याबाबत विचारले. तेव्हा मी त्याला लोमटेंच्या कथेबाबत सांगितले असता तो लगेच तयार झाला आणि आम्ही ‘सरपंच भगिरथ’ या चित्रपटाला सुरुवात केली. जाती व्यवस्था आज पुसली जात आहे असे म्हटले जाते, परंतु ती आजही असल्याचे ते म्हणाले.

राजकारणही जाती- धर्मावर
शाळेमध्येही प्रथम जात विचारली जाते आणि टीसीवरही जातीचा उल्लेख असतोच. राजकारणही आज जाती-धर्माच्या आधावरच केले जाते आणि मतेही याच मुद्दय़ावर मागितली जातात. असे असताना जाती व्यवस्था नष्ट झाली असे आपण कसे म्हणू शकतो. या चित्रपटातून मी हाच विषय प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागातील कथा असली तरी शहरी प्रेक्षकांनाही ती आवडेल अशा पद्धतीने आम्ही याची मांडणी केली आहे.

पटकथा आमदाराची
‘सरपंच भगीरथ’मध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर यांच्या मुख्य भूमिका असून लोकशाहीर संभाजी भगत यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. संभाजी भगत यांचा चित्रपटाला संगीत देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विशेष म्हणजे चित्रपटाची पटकथा गोव्याचे आमदार लेखक विष्णू सूर्या वाघ यांची आहे. त्यांचाही हा पहिलाच प्रयत्न आहे.