आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WEDDING ALBUM : रमेश-सीमा देव पुन्हा एकदा अडकले लग्न बंधनात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन जोडपे म्हणून अमिताभ आणि जया यांच्या तोडीस तोड रमेश आणि सीमा देव यांचे उदाहरण दिले जाते. या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याने यंदा पन्नाशी गाठली. याचेच औचित्य साधत 1 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात रमेश आणि सीमा देव पुन्हा एकदा लग्नगाठीत अडकले.

1 जुलै 1963 या दिवशी साजऱ्या झालेल्या त्या विवाहसोहळ्याच्या गोड आठवणी जाग्या करण्यासाठी देवांचे सुपुत्र अजिंक्य आणि अभिनय देव तसंच त्यांच्या नातवंडांनी हा खास सोहळा आयोजित केला होता. 84 वर्षीय वर आणि 70 वर्षीय वधू यांना पुढील वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा रमेश-सीमा देव यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...