आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैमध्ये होणार पीकूची कार्यशाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजित सरकारचा 'पीकू' अनोख्या स्टारकास्टने सजलेला आहे. चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत इरफान खानही असणार आहे. तसेच यात दीपिका पदुकोन आणि बंगाली अभिनेता जिशू सेनगुप्ताही आहे. चित्रपटाचे तीन मोठे स्टार सध्या आपल्या कामात व्यग्र आहेत. अशा वेळी 'पीकू'च्या तयारीसाठी कार्यशाळा आयोजित करणे सुजित सरकारसमोर मोठे आव्हान होते.
सुरुवातीला अमिताभ, इरफान आणि दीपिकाला वर्कशॉपमध्ये त्यांच्या सोयीनुसार आणणार असल्याचे सुजितने सांगितले होते. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यातील तारीख वर्कशॉपसाठी निश्चित केली आहे. सर्व पात्रांची तयारी आणि रंगीत तालीम यासाठी दोन आठवड्यांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून शूटिंग सुरू केले जाईल.