आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PIX: Sharukh, Deepika At Karim Morani's Birthday Party

PIX: शाहरुख-दीपिकासह फराहने केले करीम मोरानीला बर्थ डे विश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण याकाळात आपल्या आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा फराह खान दिग्दर्शित करत आहे. आपल्या बिझी शुटिंग शेड्युलमधून वेळ काढत हे सर्व स्टार करीम मोरानी यांच्या बर्थ डे पार्टी सहभागी झाले होते. करीम यांनी आपल्या जुहू स्थित बंगल्यावर पार्टी आयोजित केली होती.
शाहरुख आणि करीम मोरानी खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे पार्टीत शाहरुखने उपस्थिती लावणे स्वाभाविकच होते. शाहरुखसह दीपिका आणि फराह यांनीही पार्टीत सहभागी होऊन आनंद लुटला.
या पार्टीत अभिनेता सोनू सूद, नसरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान, चंकी पांडे, विंदू दारा सिंहसह बरेच सेलेब्स सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करीम मोरानी यांच्या बर्थ डे पार्टीत पोहोचलेल्या स्टार्सची खास झलक...