आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PK Breaks Box Office Collection Records, Earns Rs. 278 Crore

आमिरच्या \'PK\'ने मोडला \'धूम 3\'चा विक्रम, 14 दिवसांत कमावले 284 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक वाद, निदर्शने होऊनदेखील आमिर खान अभिनीत 'पीके' चित्रपटाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. 19 डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून "पीके'ने तब्बल 284 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

या आठवड्याअखेर हा आकडा ३०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. केवळ चौदाच दिवसांत "पीके'ने सर्वाधिक कमाईचा विक्रम आपला नावे केला आहे. या आधी आमिर खानच्याच "धूम ३' चित्रपटाच्या नावावर हा विक्रम होता.

राजकुमार हिराणी दिग्दर्शित "पीके' चित्रपटावर अनेक संघटनांनी आक्षेप घेत निदर्शनेही केली होती. हिराणी म्हणाले की, रसिकांनी चित्रपटाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला आहे. "पीके' बॉक्स ऑफिसवरचे सर्व विक्रम मोडीत काढेल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. शेवटी आशय हाच चित्रपटाचा राजा असतो, ही भावना "पीके'ने सार्थ करून दाखवली आहे.

अशीच आशयघन चित्रपटनिर्मिती आपण पुढेही करत राहू. रसिक हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत आहेत. हा सुखद अनुभव आहे, असे हिराणी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. आमिर खान आणि राजकुमार हिराणी या जोडीचा "पीके' हा दुसरा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या थ्री इडियट्स चित्रपटाने २०२ कोटींचा व्यवसाय केला होता.

आमिर ठरला ट्रेंडसेटर
100 कोटी रुपये कमावणार्‍या चित्रपटांची सुरुवात आमिर खानच्याच गजनी चित्रपटापासून झाली होती.
200 कोटी रुपये कमावणार्‍या क्लबचीही सुरुवात आमिरच्याच थ्री इडियट्सने झाली होती.
270+ कोटींपर्यंत मजल मारणार्‍या चित्रपटांचा प्रारंभही आमिरच्याच धूम ने झाला होता.
350 कोटी रुपयांची अभूतपूर्व कमाई पीके करू शकतो, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

मालामाल चित्रपट
- पीके : 284
- धूम 3 : 271.82
- किक : 244
- क्रिश 3 : 240.50
- चेन्नई एक्स्प्रेस : 228
- थ्री इडियट्स : 202
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पीकेचा वीक बाय वीकचा बिझनेस...