आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box Office Collection: 2 दिवसांत 'पीके'ने कमावले 57 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 'पीके' बॉक्स ऑफिसवर चांगा बिझनेस करत आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करून जवळपास 27 कोटींचा व्यवसाय केला आहे. सिनेमाच्या यशाचा सिलसिला सुरु आहे. सिनेमाने शनिवारी (20 डिसेंबर)सुध्दा जवळपास 30.34 कोटींचा बिझनेस केला. पीकेने शनिवारपर्यंत (20 डिसेंबर) एकूण 57.34 कोटींचा बिझनेस केला आहे.
पीकेचा थिएटरमधून चांगला रिपोर्ट मिळत आहे. सोबतच, सिनेमाला माऊथ पब्लिसिटीसुध्दा चांगली मिळाली आहे. तसेच, समीक्षकांनी सिनेमाची भरभरून प्रसंशा केली आहे . येत्या दिवसांत सिनेमा अनेक रेकॉर्ड्स कायम करू शकतो असे अंदाज बांधले जात आहेत. एका प्रतिष्ठित मीडिया हाऊसनुसार, दुस-या दिवशी सिनेमाला सकाळच्या शोमध्ये हलकी सुरुवात मिळाली. परंतु दुपारीपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सिनेमाच्या बिझनेस गती धरली.
सिनेमा पंडितांना विश्वास आहे, की रविवारी (21 डिसेंबर) सिनेमा चांगले प्रदर्शन करेल आणि या दिवशीची कमाई दोन दिवसांच्या तुलनेत वाढेल. 'पीके'साठी अॅडवान्स बुकिंग सुरु आहे. सिनेमा समीक्षकांकडून पीकेला शानदार सिनेमा असल्याचा करार भेटला आहे. त्यानंतर प्रेक्षकांमध्येसुध्दा हा सिनेमा पाहण्याची उत्सूकता वाढली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा बिझनेसविषयी काय म्हणतात 'एक्सपर्ट'...